Ajit Pavar Big News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आताच मागील भाषणांमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी जाहीर केले की या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे १० ऑक्टोबरपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातील. योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यामुळे पुढील हप्त्यांसाठी कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय, अजित पवार यांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः गरीब आणि गरजू महिलांसाठी योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.Ajit Pavar Big News
अजित पवार यांनी बारामतीमध्ये नुकत्याच केलेल्या भाषणात काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ‘पंच शक्ती’ नावाचा उपक्रम जाहीर केला. याअंतर्गत, शाळा, महाविद्यालये, कार्यालये यांसारख्या ठिकाणी ‘शक्ती बॉक्स’ तक्रार पेट्या बसवण्याचे काम केले जाणार आहे, ज्यामुळे महिलांना तक्रारी निर्भयपणे नोंदवता येतील. तसेच, ‘शक्ती नंबर’ (9209394917) सुरू करण्यात आला आहे, जो 24/7 उपलब्ध असेल आणि महिलांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण होईल. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘शक्ती कक्ष’ स्थापन करून तक्रारींची सोडवणूक केली जाईल
याशिवाय, अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक वित्तीय तरतूद केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी रुपयांची तरतूद आहे, आणि नऊ महिन्यांसाठी 35,000 कोटी रुपये आवश्यक असतील. त्यांनी बारामतीमधील महिलांशी संवाद साधताना विचारले असता बहुतेक महिलांनी आपले हफ्ते मिळाले असल्याचे सांगितले.Ajit Pavar Big News