Savings Group Scheme: नमस्कार मित्रांनो आज आम्ही या बातमीमध्ये तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. या बातमीमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की ती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. मित्रांनो बचत गट म्हंटलं तर सर्वात जास्त यामध्ये महिलांचा या मध्ये समावेश असतो. बचत गटाच्या धारकांना सरकार 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देणार अशी माहिती समोर आली आहे. या योजनेचा ज्या नागरिकांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा या अर्जाची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे त्यानंतर अर्ज करता येणार नाही.
मित्रांनो सरकारने काढलेल्या या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवोदय लोक या नागरिकांसाठी मिनी ट्रॅक्टर भेटणार आहे त्याचबरोबर जे बचत गटामध्ये समावेश आहेत त्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेचा लाभ कशाप्रकारे लिहिता येईल याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूया.
बचत गट अंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हा अर्ज भरावा लागेल. कारण 16 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे तरच तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. या बौद्ध गटामध्ये स्वयं सहायता हा बचत गट आहे त्यांनीच या योजनेचा अर्ज करायचा असे समाज कल्याण विभागाचे देविदास नांदगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आणि या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती यांनाच लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये त्यांना जे ट्रॅक्टर देण्यात आले आहे त्याची जेवढी किंमत असेल त्याची 90% सरकार पैसे देणार आहे. 90% अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा जे मिनी ट्रॅक्टर असणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे असे सांगण्यात आले आहे. आणि त्याचबरोबर ट्रॅक्टरचे काही साधने असतात ते कल्टीवेटर रोटा वेटर टेलर यासारख्या पुरवठा देखील यामध्ये तुम्हाला करता येईल.
जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांनाच या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे त्याचबरोबर अध्यक्ष सचिव वाईन शेष टक्के सदस्य असणार त्यांनादेखील या योजनेमध्ये समावेश होता येणार आहे. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर हे तुम्ही जास्तीत जास्त तीन लाख 50 हजार रुपयाच्या आतच तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर जर किंमत यापेक्षा जास्त असेल तर ते पैसे तुम्हाला स्वतः भरावे लागतील.Savings Group Scheme