Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की पिकाचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सरकारकडे अर्ज कसा करायचा. तसेच वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी सरकारकडे किती दिवसात आवेदन करावे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे किती दिवसात होतात? पिक विमा कंपनीला एक नुकसानीची माहिती कशी कळवायची? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे तसेच सोयाबीन आणि इतर पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि नुकसान झाल्यानंतर अनेक जण लगेच ताबडतोब जाऊन विमा कंपनीला सूचना देऊन टाकतात. अनेक जण चिखलात पाण्यामध्ये जाऊन नुकसानीची माहिती म्हणजेच फोटो काढून ठेवतात. आणि विमा कंपनीला त्यांच्या एप्लीकेशन द्वारे पाठवतात.Pik Vima
परंतु शेतकऱ्यांना जास्त ताण होऊ नये म्हणून विमा कंपनी व तसेच सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अहवाल सादर करण्यासाठी 72 तासाची वेळ देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या अगोदर नुकसान झाल्याची तक्रार कंपनीकडे करू शकता. नुकसान झाल्याची माहिती कंपनीकडे दिल्यानंतर तुम्हाला डॉकेट आयडी मिळेल.
तसेच काही दिवसानंतर शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने देखील पाहू शकतात. त्याचबरोबर नुकसानीची तक्रार कंपनीकडे गेल्यानंतर कंपनीतील प्रतिनिधी पिकाचे नुकसान किती झाले आहे. हे पाहण्यासाठी शेतकऱ्याच्या थेट शेतात पोहोचतात. त्यानंतर प्रतिनिधी शेतीची अहवाल तयार करतात. आणि तयार केलेले अहवाल पिक विमा कंपनीला देतात. त्यानंतर पिक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करते…Pik Vima
पिक विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा