Mahila Kisan Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत, महिलांसाठी सरकार महिला किसान ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा या बातमीमध्ये योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि योजनेचा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे.
महिला किसान योजनेअंतर्गत ज्या महिलांचे नावे किंवा पती-पत्नीच्या या दोघांच्या नावावर किंवा पतीच्या नावावर सातबारा असेल तर त्या महिला लाभार्थ्यांच्या प्रति प्रतिज्ञा पत्राद्वारे आपल्या पतीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनी ची नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल तर अशा महिला लाभार्थी म्हणून त्यांना पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.
महिला किसान योजना अंतर्गत महिलांना 10 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. उरलेली 40 हजार रुपये कर्जाच्या स्वरूपात वार्षिक 5% व्याजाने मंजूर करण्यात आले आहे. चाळीस हजार रुपयांची रक्कम तुमच्या स्टेट बँक मध्ये जमा करण्यात येतील. दहा हजार रुपयांचे अनुदान मिळून पन्नास हजार रुपयांची अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. ही कर्ज योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आहे या योजनेचा शेतकरी लाभ घेऊ शकतात
योजनेच्या विशेषता
- महिलांना दहा हजार रुपयांचे अनुदान मिळणार.
- 5 हजार रुपयांच्या अर्थसहाय्य
- 40 हजार रुपये वार्षिक 5% व्याजाने मिळणार
- योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांच्या किंवा पती पत्नीच्या किंवा पतीच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे.
- योजनेचा अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रासाठी संपर्क साधावा लागेल.
महिला किसान या योजनेअंतर्गत सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरच अर्ज करावा लागेल.Mahila Kisan Yojana