Free Flour Yojana: मोफत पिठाची गिरणी योजना सुरू झाली आहे..!! महाराष्ट्रात याच महिलांना मिळत आहे लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Flour Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये अनेक योजना शाळेतील मुलांसाठी, तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी देखील यामध्ये अनेक योजना आहेत. त्याचबरोबर आताच केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरुणांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी कर्जाची सुविधा दिली जाणार असल्याची योजना राज्यभरात राबवली जाणार आहे.

त्याचबरोबर राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील आणि दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब महिलांनी स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. आणि याच उद्देशाने महाराष्ट्र सरकार महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवत आहे.Free Flour Yojana

या योजनेमुळे महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय करू शकत आहेत. त्याचबरोबर ही योजना शंभर टक्के अनुदानावर महिलांसाठी राबवली जात आहे. यामुळे पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी महिलेला स्वतः जवळील एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामीण भागात तसेच शहरी भागात अनेक महिला सुशिक्षित आहेत. परंतु नोकरी उपलब्ध नसल्यामुळे त्या बेरोजगार राहिल्या आहेत. तसेच अनेकांची आर्थिक स्थिती खूपच हालाखीची असते. यामुळे या महिला शेतात जाऊन काम करून आपला उदरनिर्वाह भागवत असतात. तसेच शहरातील महिला दुसऱ्याच्या घरी भांडे किंवा धुणे धुवून रोजगार मिळवत आहेत.

त्याचबरोबर आता शासनाने मोफत पिठाची योजना सुरू केल्यामुळे आता या महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता येईल. त्याचबरोबर या व्यवसायातून महिलांना पैसा आल्यावर कुटुंबाचा खर्च भागवता येईल.

त्याचबरोबर मोफत पिठाची गिरणी योजना ही महिला व बालकल्याण विकास विभागाअंतर्गत राबवली जात आहे. या योजनेचा अर्ज महिला ऑनलाईन सीएससी सेंटर वर जाऊन करू शकतात…Free Flour Yojana

Leave a Comment