Sim Card News दररोज 2GB डेटा आणि 365 दिवसांची वैधता; BSNL प्लॅन्ससमोर Jio-Airtel विसरून जा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim Card News Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) सारख्या खाजगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. याचाच फायदा घेत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल लवकरच देशभरात 4जी सेवा सुरू करणार असून त्यांनी स्वस्त प्लॅनही लॉन्च केले आहेत. खासगी कंपन्यांच्या वाढत्या रिचार्जमुळे अनेक ग्राहक बीएसएनएलकडे पोर्ट करत आहेत.

देशभरात 4G सेवा सुरू झाल्यानंतर, अधिक वापरकर्ते BSNL मध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या एका प्लॅनची ​​सध्या सर्वाधिक चर्चा आहे. हा प्लॅन ३९५ दिवसांसाठी आहे. फायदे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या प्लॅनची ​​सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत हा खूप स्वस्त आहे.

BSNL चा ३९५ दिवसांचा प्लॅन
BSNL चा 395 दिवसांचा प्लॅन 2,399 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये युजरला देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज 2 जीबी डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉल्स मिळतील. याशिवाय 100 एसएमएसची सेवाही उपलब्ध आहे. याशिवाय झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स आणि गेमऑन ॲस्ट्रोटेल या सेवाही उपलब्ध असतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim Card News जिओ-एअरटेल प्लॅन
Jio आणि Airtel चे सारखेच प्रीपेड प्लॅन आहेत, पण त्यांची किंमत BSNL पेक्षा खूप जास्त आहे. या दोन्ही कंपन्या 3599 रुपयांमध्ये 365 दिवसांचा प्लॅन देत आहेत. या प्लॅनमध्ये Airtel दररोज 2 GB डेटा देत आहे, तर Jio 2.5 GB डेटा देत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या वापरकर्त्यांना 5G सेवा देत आहेत. बीएसएनएल सध्या या बाबतीत मागे आहे. पण, बीएसएनएल लवकरच अपडेट होईल.

Leave a Comment