Kanyadan Yojana Maharashtra: मुलीच्या लग्नासाठी वडिलांना मिळणार 25 हजार रुपये अनुदान..!! फक्त या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करावा लागणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanyadan Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, मुलीच्या विवाह साठी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्या व्यक्तीवर मोठा आर्थिक भार पडतो. आणि या आर्थिक भारामुळे अनेक जण छोट्या पद्धतीने लग्न देखील करतात. परंतु लग्न करायचे म्हटल्यावर खर्च तर होतोच. यामुळे सरकार आता मुलींचे लग्न करण्यासाठी मुलीच्या वडिलांना 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. यामुळे मुलीचे लग्न मोठ्या पद्धतीने धूमधाक्यात होईल.

20 मे 2024 रोजी पालघर या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा ठेवण्यात आला होता. आणि हा सामूहिक विवाह सोहळा पार पडत असताना. सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मुलीच्या वडिलांना अनुदान देखील दिले जाणार होते. मात्र त्यावेळी हे अनुदान 20000 रुपये होते. आणि आता सरकारकडून या अनुदानात पाच हजार रुपयांनी वाढ करून मुलीच्या लग्नासाठी वडिलांना पंचवीस हजार रुपये देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

या योजनेचा लाभ हा मुलीच्या कुटुंबांना महिला व बालविकास विभाग अंतर्गत शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणी या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घेता येईल. त्याचबरोबर सामूहिक विवाह करणाऱ्या संस्थांना 2500 रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाते. हा निर्णय 13 मार्च 2020 रोजी सरकारने घेतला होता.Kanyadan Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबांना मिळतो

या योजनेचा लाभ हा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या मुक्त जातीतील, विशेष मागास प्रवर्गातील तसेच इतर मागास प्रवर्ग जातीतील जोडप्याचे लग्न लावून देण्यासाठी मुलीच्या वडिलांना पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा विवाह सोहळा पार होणार आहे. त्या ठिकाणी आयोजन करणाऱ्या संस्थांना देखील सरकारकडून अनुदान देण्यात येते.

या योजनेची रक्कम लाभार्थी वडिलांना कशी दिली जाते?

सामूहिक विवाह पार पाडण्यासाठी वडिलांनी केलेली धावपळ त्याचबरोबर केलेल्या पैशाचा खर्च आणि पाहुण्यांना तसेच नातेवाईकांना केलेला स्वयंपाक यासाठी भरपूर खर्च येतो. आणि हा खर्च अनेकांना झेपत नाही. आणि यामुळे अनेक जण यासाठी देखील कर्ज घेतात. यामुळे सरकारनेच मुलीचे लग्न लावून देण्यासाठी मुलीच्या वडिलांना 25 हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचबरोबर हे पैसे मुलीच्या वडिलांना डीबीटी पद्धतीने थेट मुलीच्या वडिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील…Kanyadan Yojana Maharashtra

Leave a Comment