Rbi News नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आज आम्ही बँका बद्दल माहिती घेऊन आलो होतो म्हणजे आरबीआय कडून खाली दिलेल्या दोन बँकांवर कारवाई करण्यात आले आहे आणि खातेधारकाला याचे काही नुकसान होणार का याची माहिती आपण पाहूयात.
अनेक बँका आरबीआयचे नेमाचे पालन करत असतात पण काही बँका आरबीआयचे नियमाचे पालन करत नाहीत यामुळे त्यावर आरबीआय वेळोवेळी दंड टाकत असतो आता असेच काही झाले आहे देशांमध्ये असणाऱ्या दोन मोठा बँका यांच्यावर कारवाई झाली आहे ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रकार ने आरबीआयने शिक्षा सुनावली आहे यामध्ये पाहिले तर खाजगी क्षेत्रामधील दोन बँका आहेत.
कोणत्या बँकांवर कारवाई झाली आहे
Rbi News एचडीएफसी आणि ॲक्सिस बँक या दोन बँकांवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आलेले आहेत या दोन्ही बँका नियमांचे पालन केलं नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई झाली ही माहिती खातेधारकांना असायला हवी या बँकांनी अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून कारवाई संबंधित माहिती दिली आहे.
प्रत्येक आर्थिक संस्था आणि बँकांच्या कारभारावर आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नजर ठेवून असतो नियमांचे उल्लंघन केल्यास आरबीआय कोणत्याही बँकांना सुट्टी देत नाही त्यावर कारवाई करत असतो.
या दोन्ही बँकांवर मिळून पाहिले तर 2.91 कोटी रुपये दंड ठोकण्यात आला आहे हा दंड ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या केवायसी डिपॉझिट व्याजदर आणि इतर सेवांमध्ये सुविधांमध्ये बेजबाबदारपणा दिसून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आले आहे.
यामध्ये पाहिले तर एचडीएफसी बँकेला आरबीआयकडून 1 कोटी रुपयांचा दंड ठोकवण्यात आला आहे तर ॲक्सिस बँकेला 1.91 दंड ठोकण्यास आला आहे, या दोन्ही बँकांना मिळून कोट्यावधी रुपयांचा दंड ठोकवण्यात आलेला आहे यामुळे कोणत्याही प्रकारे ग्राहकांना म्हणजेच खातेधारकांना फरक पडणार नाही कारण की बँकांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे की दैनंदिन बँक व्यवहार प्रभावित होणार नाही असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.Rbi News